• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सिरसोली युद्धभूमीवर राष्ट्र प्रेमींनी वाहली शूरवीरांना श्रद्धांजली

Team by Team
November 30, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
सिरसोली युद्धभूमीवर राष्ट्र प्रेमींनी वाहली शूरवीरांना श्रद्धांजली
26
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

सिरसोली(विनोद सगणे)- सिरसोली येथे मराठा इंग्रज यांच्यादरम्यान झालेल्या युद्धामध्ये अठरा पगड जातीतील सैनिक जिवाची पर्वा न करता लढले.या युद्धात मायभुमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर योद्धांना दरवर्षीप्रमाणे 29 नोव्हेंबरला श्रद्धांजली वाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने युद्धभूमीवर उपस्थिती होती.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली या गावी 23 ते 29 नोव्हेंबर१८०३ मध्ये मराठा व इंग्रज यांच्या मध्ये फार मोठे युद्ध झाले होते लॉर्ड आर्थर वेलस्ली यांच्या उपस्थितित कॅप्टन केन हा इंग्रजी फौजेचे नेतृत्व करत होता . तर मराठा फौजेचे नेतृत्व श्री मनोहर बापु भोसले हे करीत होते .त्यांना विश्वासू शुरविर समशेरबहाद्दर सरदार श्री कर्ताजीराव जायले मदतीला होते.हे युद्ध ६ दिवस चालले. इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्रे असुनही मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्य कापून काढले होते. कर्ताजीराव जायले यांनी स्वतःचे बलीदान देऊन कप्टन केनला ठार मारले .अठरा पगड जातीतील सर्व सैनिक जिवाची पर्वा न करता लढले व अतुलनीय शौर्य गाजविले. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अनंतराव गावंडे यांनी यावेळी दिली. तद्नंतर इतिहास अभ्यासक प्रा संतोष झामरे यांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांनी माय भूमि च्या प्रेमाची ज्योत प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत केली होती, त्याची प्रचिती शिरसोली येथील युद्धात पाहावयास मिळाली असे साद्यंत वर्णन त्यांनी आपल्या भाषणात केले. इतिहासप्रेमी संघर्ष सावरकर व संदीप बोबडे यांनी युद्धभूमीचे इतिहासाबद्दल माहिती दिली.यावेळी पुरुषोत्तम लाजूरकर यांनी शौर्य गीत सादर केले. यावेळी अकोट न पा सदस्य मनीष कराळे,विवेक बोचे श्रीकांत गायगोले,अवि विष्णुपंत गावंडे, राजूभाऊ नागमोते, उमेश जायले, शिवशंकर जायले , पिंटू पाटील वडतकार पुरुषोत्तम मोहोकार, विष्णू झामरे, ऋषिकेश खोटरे,संतोष ताकोते ,वैभव आखरे ,अविनाश सावरकर, संदीप कुलट, अमर भागवत, प्रवीण सिरस्कार, अभिलाष निचळ नंदूभाऊ आढाऊ, योगेश वाकोडे ,अनिल बिहाडे, विजय जायले,राम म्हैसने, राजू गावंडे ,रामदास चौखंडे ,विजय उगले, राजेश सगने, प्रशांत काईंगे ,अरुण गावंडे, वैभव चिकटे ,विजय बेदरकर, संजय खोटरे, संदीप गावंडे ,पप्पू धंदारे, गणेशा आंग्रे, मुरली नहाटे ,बापूराव नहाटे, विनायकराव नहाटे, अमोल नहाटे कुणाल कुलट ,मराठा महासंघाचे सचिन शिंदे, किशोर देशमुख ,निखील कुलट ,सौरव इंगळे, विजय इंगोले ,शक्ती गीते, राहुल काळे, प्रवीण भगत, प्रयत्न कराळे, नंदू गेबड आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सर्वप्रथम शिरसोली गावातील मोकास वाडा येथे इतिहास प्रेमींनी भेट दिली तद्नंतर युद्धभूमीवर येऊन श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: सिरसोली
Previous Post

महात्मा फुले पुण्यतिथी तसेच 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड व संत सावता माळी युवक संघ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

हिवरखेड येथील देवळीवेस शकर सस्थान मदिंरच्या काकडा आरतीचे समाप्ती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हिवरखेड येथील देवळीवेस शकर सस्थान मदिंरच्या काकडा आरतीचे समाप्ती

हिवरखेड येथील देवळीवेस शकर सस्थान मदिंरच्या काकडा आरतीचे समाप्ती

आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांची आत्महत्या

आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांची आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.