• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

केंद्रातील अनुसूचित जाती जमाती आदिवासींच्या शिक्षणबंदी चा मनुवादी अजेंडा राबविण्यासाठी भाजपने मोदी च्या माध्यमातून शिष्यवृत्ती निधी देणे बंद केला – राजेंद्र पातोडे

Team by Team
November 29, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
केंद्रातील अनुसूचित जाती जमाती आदिवासींच्या शिक्षणबंदी चा मनुवादी अजेंडा राबविण्यासाठी भाजपने  मोदी च्या माध्यमातून शिष्यवृत्ती  निधी देणे बंद केला – राजेंद्र पातोडे
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अनुसूचित जाती जमाती आदिवासींच्या शिक्षणबंदी चा मनुवादी अजेंडा राबविण्यासाठी भाजपने मोदी च्या माध्यमातून शिष्यवृत्ती बंद केली आहे.भाजप संघाचे शिक्षण बंदीचा पूरातन कार्यक्रम राबवायला घेतला आहे. एससी/एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबवुन सरकारने आपले मनसुबे जाहीर केल्याची टीका वंचित बहूजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने निधी देणेच बंद केल्यामुळे अनुसूचित जातीच्या (एससी) विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती १४ राज्यांनी बंद केली आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या देशभरातील विद्यार्थांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे मॅट्रिकोत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

गेल्या वर्षभरापासून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर हा मुद्दा मान्यतेसाठी प्रलंबित आहे. प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महिन्यात झालेल्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. पात्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना त्यांचे मॅट्रिकोत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या १०० टक्के निधीतून शिष्यवृत्ती मिळत आहे. अनुसूचित जमातीच्या (एसटी) पात्र विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या ७५ टक्के निधीतून शिष्यवृत्ती सुरु आहे. मात्र अनुसूचित जातीच्या ६० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद पडली आहे. कारण केंद्र सरकार या शिष्यवृत्तीसाठी केवळ १० टक्केच निधी देत आहे. त्यामुळे २०१७-१८ पासून निधीच्या चणचणीमुळे एकापाठोपाठ एक राज्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्तीच बंद करत आहेत, असा मुद्दा या बैठकीत समोर आला आहे.

२०१७ मध्ये केंद्र सरकारने वचनबद्ध दायित्व निधीचे सूत्र स्वीकारले. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीचा ९० टक्के बोजा राज्य सरकारांवर येऊन पडला. आधी केंद्र सरकार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ६० टक्के निधी देत होते. त्यात राज्य सरकारे आपला ४० टक्के वाटा टाकून या योजनेची अंमलबजावणी करत होते. मात्र २०१७ पासून केंद्र सरकारने या निधीत कपात करून तो केवळ १० टक्क्यांवर आणला आहे. या शिष्यवृती योजनेचे ६०:४० केंद्र-राज्य निधीचे सूत्र पाळण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे अनेक राज्यांनी तीव्र आक्षेपही नोंदवला आहे.

केंद्र सरकारच्या वचनबद्ध दायित्व निधीच्या सूत्रामुळे २०१७ ते २०२० या काळात अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत अनेक राज्यांत प्रतिकुल परिणाम झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा झारखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगण, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांनी अनेकदा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडे हा मुद्दा उपस्थित केला.

राज्य सरकारे ट्यूशन फी, वसतिगृह आणि देखभाल खर्चाचा संपूर्ण भार उचलत असल्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ६०:४० चा फॉर्म्युला पुन्हा लागू करावा, या साठी ही राज्ये केंद्र सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करत आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची असून त्याच योजनेच्या निधीत केंद्र सरकारने ५० टक्के कपात केल्यामुळे ही योजना जवळपास १४ राज्यांत बंद पडली आहे. तर काही राज्ये स्वतःच्या बळावर ही योजना कशीबशी चालवत आहेत. त्याचा फटका अनुसूचित जातीच्या ६० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे.त्यामुळे सरकारने तातडीने ही शिष्यवृत्ती मंजूर करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देखील वंचितने दिला आहे.

Tags: राजेंद्र पातोडेवंचित बहूजन आघाडी
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम

Next Post

वाडेगांव येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
वाडेगांव येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

वाडेगांव येथील शेतकरी पुत्राची आत्महत्या

वाडेगांव ग्राम पंचायत कार्यलयासमोर घानीचे साम्रज्य,दवाखान्यातील साहीत्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता!

वाडेगांव ग्राम पंचायत कार्यलयासमोर घानीचे साम्रज्य,दवाखान्यातील साहीत्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.