अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथे दिवसेंदिवस वाहन धारकाची संख्या प्रचंड वाढत आहे.विशेषतः शहापूर बृहूत आराखडया अंतर्गत नावाने झालेले मोठे धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सावरा गावातील मेन रोडवर कदाचित अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापुर्वी सदर बायपास रस्ता संदर्भात मोजमाप व पाहणी सुध्दा झाली होती.पुढे काय झाले हा प्रश्न शासनाच्या लालंफीतीत अडकला आहे.तरी सावरा ग्रामस्थांची गावाच्या बाहेरून बायपास रोडची मागणी जोर धरत आहे.सदर प्रश्न संबंधात मा.उपविभागीय अधिकारी यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.तरी महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यांनी सदर गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सावरा ग्रामस्थांनी केली आहे.