कोल्हापूर : कार्तिक पौर्णिमेला जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी रविवारी (दि.२९) व सोमवारी (दि.३०) या दोन दिवशी मर्यादित भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी काढला. जोतिबा डोंगरावर वाहन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे या दोन दिवसात दुचाकीवरून केवळ एक, चार चाकीमधून केवळ दोन लोकांनाच प्रवास करता येणार आहे. या दोन दिवसांत भाविकांनीही गर्दी टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.