तेल्हारा – आज दुपारी शहरातील एका ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
शहरातील भाजी मंडी जवळ राहणाऱ्या राधेश्याम शिवदास जिंदे वय ३२ वर्ष याने आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.जिंदे यांच्या घरी मोठ्या थाटात दोन दिवस अगोदर लग्नाचा कार्यक्रम झाला आनंदाच्या क्षणात राधेश्याम याने आत्महत्या का केली हा प्रश्न घरच्यांसह शहरातील नागरिकांना पडला आहे .मृतकाच्या पश्चत एक मुलगा एक मुलगी पत्नी आई वडील भाऊ बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.पुढील तपास ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ सुरेश काळे ,राजू इंगळे हे करीत आहेत.