तेल्हारा : टाळेबंदीचा कालावधीतील वीज देयके माफ करा कृषी पंपांना सतत आठ तास विद्युत पुरवठा द्या कृषी व गावठाणांचे नादुरुस्त विद्युत रोहित्र तीन दिवसात दुरुस्त करा ऑनलाइन चा मुबलक पुरवठा करा विद्युत रोहित्र घेण्यासाठी सक्तीची वसुली बंद करा या मागणीसाठी दि 23 नोव्हेंबर रोजी तेल्हारा येथील अग्रेसन टॉवर चौकात भाजपातर्फे देयकांची होळी करून राज्य सरकार यांच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
तेलारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात हिवरखेड बेलखेड अडगाव बु तळेगाव पातुर्डा ग्रामीण भागात वीज बिलांची होळी करण्यात आली तसेच भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात तेल्हारा शहरातील टॉवर चौक येथे राज्यव्यापी विज देयकाची होळी करून महा विकास आघाडी सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष नयनाताई मनतकार न प अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर महिला आघाडी तालुका अध्यक्ष मोनिकाताई वाघ तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर सरप शहर सरचिटणीस रवि गाडोदिया उपाध्यक्ष विजय देशमुख भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले न प बांधकाम सभापती सुनिल राठोड सुनिल चहासगुणे तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल मिटकरि योगेश भारुका मोहन चंदन सुमित गंभिरे नागोराव वानखडे श्यामल देशमुख गोकुळ हिंगणकार श्रीकृष्ण वानखडे माहादेराव नागे राहुल झापर्डे श्रीकृष्ण पवार छोटू विखे हरीश शर्मा ज्ञानेश्वर वरुळकार प्रविण बुरघाटे राजेश बुरघाटे श्याम वानखडे,मुन्ना भाऊ भावेश पवार,अब्दुल अतिक माजी ता अध्यक्ष अल्प आघाडी, बाबुराव खंडारे राहुल फाटे अक्षय छांगाणी,जितू पवार, सचिन बागलकर राऊत ,अतुल गोमासे,पप्पू खिरोडकार, अमोल वाकोडे,राजू तायडे शिवा अमृतकार रफिक भाई जाकीर भाई राजा कुरेशी रवी वानखडे तालुका सरचिटणिस , पुंजाजी मानकर , डॉ. मनमोहन व्यास युवा मोर्चा अध्यक्ष पंकज देशमुख संजय राजनकार अरुण ढोकणे आरिफ भाई मुल्लाजी तालुका बुथ प्रमुख दीपक कौटकार पवन देशमुख प्रल्हाद भोपळे अभिजीत आप्पा ढगे प्रफुल मानकर मंगेश बावस्कार तोफिक आली मिरसाहेब बबलू देशमुख रितेश देशमुख कार्यकर्त्यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला महाविकासआघाडी सरकारने विज देयकात सवलत जाहीर केले मात्र वीजग्राहकांच्या तोंडाला पाने पुसून विश्वास घात केला.