अकोला : महीला व बाल विकास विभागांतर्गत 14 नोव्हेबर हा बालक दिन आणि 20 नोव्हेबर हा जागतिक बाल हक्क दिन सर्वत्र साजरा केला जातो. या सप्ताहांतर्गेत तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी व्दारा संचालित चाईल्ड लाईन- 1098″जिल्हा विधि सेवा प्राधिकरण,अकोला आणि महीला व बाल विकास विभाग अकोला च्या संयुक्त विदयमाने जिल्हयात दत्तक सप्ताह,अनाथ पंधरवाडा अशा विविध उपक्रमांतर्गेत स्वाक्षरी अभियान, चाईल्ड लाईन से दोस्ती चे बेल्ट बांधणे, प्रचार रथ विविध शासकीय कार्यालयास भेटी देवुन चाईैल्ड लाईनसे दोस्ती बेल्ट बांधल्या जात आहेत.
या कार्यक्रमाची सुरवात आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आली. तसेच अनाथ प्रमाणपञ पंधरवाडा व दत्तक विधान सप्ताहाच्या बॅनरचे विमोचन केले, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दिपक इंगळे , बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, ॲड. अनीता गुरव, बाल कल्याण समिती चे सदस्या अॅड.सुनिता कपिले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, चाईल्ड लाईनचे संचालक विष्णुदास मोंडोकार, समन्वयीका हर्षाली गजभिये, पद्माकर सदांशिव, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीचे शोभना ठाकरे ,चाईल्ड लाईनचे सर्व पदाधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.