अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 53 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 41 अहवाल निगेटीव्ह तर 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8559 झाली आहे. आज दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44164 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 42928 फेरतपासणीचे 234 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1002 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44015 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37127 तर पॉझिटीव्ह अहवाल 8559 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 12 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व जेतवन नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत पारस, आनंद नगर डाबकी रोड, विठ्ठल नगर मोठी उमरी, कृषी नगर, न्यू राधाकिशन प्लॉट, राधाकिशन प्लॉट, केतकी अपार्टमेंट व व्याळा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
10 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जणांना, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक जण, अकोला अॅक्सीडेंड क्लिनिक येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण, अशा एकूण 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
204 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8559 आहे. त्यातील 282 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8073 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 204 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.