पातुर (सुनिल गाडगे)- पातुर तालुक्यातील मौजे शिर्ला येथील शहीद जवान कैलास काशीराम निमकंडेयांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यांना नियमाप्रमाणे जमीन अद्याप मिळालेली नाही आहे तरी त्यांनी पसंती दर्शविली जमीन शहीद कुटुंबीयांना देण्यात यावी याकरता पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते ठाकूर शिवकुमार सिंह बायसआणि वीर पिता काशिरामजी निमकंंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर आजपासून 4नोव्हेंबर पासून आमरणउपोषण सुरू केले आहे यामध्ये प्रशासनाला वेळोवेळी सूचना आणि निवेदन देऊन सुद्धा ही मागणी पूर्ण करण्यात आली नसल्याने सदर आमरण उपोषण करण्यात आले आहेत या मंडपाला बुधवारी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी नगर परिषद सदस्य शंकराव बोचरे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे तसेच पातुर नगर परिषद चे अध्यक्ष सौ.प्रभाताई कोथळकर उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद इकबाल नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीसौ. तुळसाबाई गाडगे, नगर परिषद सदस्य सौ. वर्षाताई बगाडे, माजी सैनिकसंजय बगाडे,सैनिक देविदास गजबे, यांनी सुद्धा भेट देऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी करून पाठिंबा दर्शविला आहे तसेच कृष्णा अंधारे, पालकमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांचे स्विय सहायक प्रकाश अंधारे , तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे, सचिन कोकाटे, महादेव निमकंडे, यांनीसुद्धा उपोषण मंडपाला भेट देऊन प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची मागणी पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली नाही