तेल्हारा (प्रतिनीधी) – जयपुर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय कबडडी चॅम्पियनशिप स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातील सात खेळाडुंनी बाजी मारली असून यामध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
सन २०२०-२०२१ च्या अमेचर युथ कबडडी फेडरेशन इंडीया यांच्या मार्फत राजस्थान येथील जयपुर येथे कबडडी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये ज्युनिअर व सिनीअर या गटामध्ये स्पर्धा आयोजित केली होती .या स्पर्धेत विवीध राज्यातील १६ संघानी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विदर्भ संघाने बाजी मारली असून दि. ३१/१०/२० रोजी हरीयाना संघाच्या सोबत झालेल्या अंतिम संघात विदर्भ संघाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकविला. विदर्भातून ज्युनिअर व सिनीअर गटामध्ये एकूण ६० खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये मुलींचा सुध्दा सहभाग होता.
या स्पर्धेत विदर्भ संघातील ४२ जणंना सुवर्णपदक व १२ मुलींना रजत पदक मिळाले असून यामध्ये तेल्हारा तालुक्यातील सात जणांनी सुवर्ण पदक पटकाविले यामध्ये सतिष आमटे (तेल्हारा) ,अर्जुन रसाळ (तेल्हारा) ,अक्षय मोरखडे (हिवरखेड ), गौरव दालके (हिवरखेड) ,अभिजीत गावंडे (वरूडा) ज्ञानेश टोले( वरूडा) , प्रेम मोहोकार (वरूडा) यांनी सुवर्ण पदक पटकाविले असून तेल्हारा तालुक्यांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. विदर्भ संघाच्या प्रशिक्षण पदाची जबाबदारी विदर्भ अमेच्यैर युथ कबडडी फेडरेशनचे सचिव जवंजाळ सर माजी सैनिक राम घंगाळ यांनी उत्तम रीत्या पार पाडून त्यांच्या उत्तम कामगीरीबददल त्यांनी सुध्दा सुवर्णपदक प्राप्त केल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
*लक्ष अँकेडमीचा मोलाचा वाटा*
तेल्हारा योथील दोन माजी सैनिकांनी सुरू
केलेल्या लक्ष अँकेडमीच्या माध्यमातून अनेक तरूण घडले असून शेकडो
तरूण रोज मैदानी खेळ खेडून नावलौकिक करीत आहेत. माजी सैनिक राम पाउलझगडे व माजी सैनिक राम घंगाळ यांच्या प्रयत्नांनी आज तेल्हारा
सारख्या गावातील तरूण राष्ट्रीय पातळीवर चमकले ही अभिमानास्पद बाब आहे.