घोडेगाव (प्रा विकास दामोदर)- दि. 3नोव्हेंबरला सकाळी सकाळी दैनंदिनी प्रमाणे मॉर्निंग वॉक , रनिंग, तथा एक्सरसाईझ करणारे मुले व्यायाम करून गावांत आले व चौकाचौकात चर्चेला उधाण घोडेगाव येथील आस नदीवर मर्डर झाला ही चर्चा आमच्या प्रतिनिधींनी देखील ऐकली सोबत चार पाच तरुण घेऊन नदीकडे गेले असता तिथे चर्चेत जसे ऐकले तसे काही एक दिसून आले नाही शेवटी बाजूच्याच शेतात काम कारणारा विक्रम खंडारे भेटला व त्याने या सर्व प्रकाराचा उलगडा करण्यास हातभार लावला. दि. 2नोव्हेंबर ला संध्याकाळी जे घडले जे लोक ते करत होते त्यांची भेट घालून दिली.
वास्त्वतः अशी आहे जडीबुटी विकणारे मूळ राजस्थानचे परंतु जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे स्थायिक झालेले राजपूत कुटुंबं शहरोशहरी जाऊन जडीबुटी विकून आपला उदरनिर्वाह करतात त्यातच दोन दिवसापूर्वी ते तेल्हारा येथे घोडेगाव रोडवर आपली राहुटी उभारून औषधी विकतात सोबत विजयसिंग राजपूत, किशनसिंग राजपूत, व राजूसिंग राजपूत व त्यांची आई शांतीबाई राजपूत व मावशी इलाचीबाई राजपूतचे वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले मग प्रेताची विल्हेवाटकुठे लावावी? हा प्रश्न त्यांना पडला शेवटी तिघे चौघे मिळून त्यांनी त्या जख्ख म्हातारीचे प्रेत आस नदीत पुलाच्या उत्तरेकडे पुरवले. पुरवतानाची वेळ संध्याकाळी 6, 7ची असल्यामुळे अनेक लोकात गैरसमज झाले व ही अफवा गावात वाऱ्यासारखी पसरली व दुसऱ्या दिवशी सकाळी बघ्यांची गर्दी होत असताना त्या रहस्याचा उलगडा आमच्या प्रतिनिधींनी केला.
इथे प्रश्न हा उद्भवतो जेव्हा त्या लोकांशी बातचीत झाली तेव्हा त्यांनाविचारले तुम्ही पोलीस स्टेशनला तुमची मुशाफिरी नोंदवली का? त्यावर ते म्हणाले नाही, हा अंतिम संस्कार करताना कोण्या जबाबदार व्यक्तीला सांगितले का? त्यावर त्यांनी सांगितले आम्ही घोडेगाव येथील सरपंचाच्या कानावर ही गोष्ट घातली. अखेर त्या व्यक्तीने गावातील काही सुज्ञ लोकांना सर्व गोष्टी खरंखरं सांगून व मयत व्यक्तीचे फोटो शेअर करून या प्रकरणाला पूर्ण विराम दिला.