अकोट(देवानंद खिरकर)- अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत मृत्युचा रस्ता अशी ख्याती असलेल्या अकोट- अकोला रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, या रखडलेल्या रस्ताचे काम तात्काळ मार्गी लागल्याकरीता सात दिवसात निर्णय द्यावा, अन्यथा शिवसेना या मार्गावर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी दिला आहे.
अकोट- अकोला रस्त्याचे काम प्रारंभी पासुनच थंडबस्त्यात सुरु आहे. कामाचे नियोजन नाही,कामावर अधिकारी, अधिकृत ठेकेदार हजर राहत नसल्याने काम प्रारंभ होताच पहील्या पावसाळ्यात अनेक अपघात झाले. काहीजण जखमी झाले गाड्याचे नुकसान झाले. पंरतु गत दोन वर्षात ४५ किमी रस्ता विकास निधी असतांनाही पुर्ण झाला नाही. लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. त्यामुळे या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर प्रारंभी काम करीत असलेल्या कंपनीकडून हे काम काढण्यात आले. नवीन कंपनीला.या रस्त्याचे कामाचे कंत्राट दिले आहे. पंरतु अद्यापही काम सुरू झाले नाही. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर धुळीचे लोट उडत असल्याने शेतकऱ्यांची पिके नष्ट होत आहे. अनेक रुग्णवाहिकांना सिरीयस रुग्ण घेऊन जातांना त्रास होतो. नियोजन नसलेल्या हा रस्ता खोदकाम करुन ठेवला आहे. नागरिकांना मनपस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता लगतचे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. अशा स्थितीत शेतकरी, वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना हा रस्ता तात्काळ सोयीचा करुन देण्यासाठी जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार संजय गावंडे,महीला आघाडीचे संघटीका माया म्हैसने यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनधारक व प्रवाशांचे आरोग्याशी खेळ सुरु असुन सात दिवसात काम मार्गी लावा,रस्ता लगत शेती असलेल्या शेतकऱ्यांचे पिके नुकसानीची दखल द्यावी अन्थया रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सांगितले