तेल्हारा(प्रतिनिधी)- निसर्गाच्या लहरीपणा यंदा शेतकऱ्यावर जीवावर बेतला असून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या सारखी वेळ आली असून बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली.
यावर्षी अवकाळी पावसाने हाताशी आलेला घास हिसकावून घेतला असून सोयाबीनसह अन्य पिके हातून गेल्याने खर्च सुद्धा निघाला नाही अशीच परिस्थिती बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण किसन खुमकर वय ५८ वर्ष यांच्याकडे जेमतेम दिड एकर शेती त्यामध्ये सोयाबिन ची पेरणी केली असता ६५ किलो सोयाबीन झाल्याने तसेच कर्जाच्या डोगर वाढत असल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अरुण खुमकर यांनी हिंगणी शेतशिवारात येत असलेल्या आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.पुढील तपास हिवरखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ संतोष सुरवडे, पो कॉ प्रफुल पवार,आकाश राठोड, हे करीत आहे.