तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा शहरातील संत रोहिदास समाज मंदिरात घाणी चे साम्राज्य निर्माण झाले असून सभागृहात सर्वत्र जनावरांची विष्ठा साचलेली आहे हे सभागृह त्वरित स्वच्छ करून सभागृहाची दुरुस्ती करण्यात यावी या करिता चर्मकार समाज बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले.
तेल्हारा शहरातील संत रोहिदास महाराज समाज मंदिर मध्ये कित्येक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य झाले आहे.या सभागृहात गोर गरीब सर्वसामान्य नागरिकांच्या कुटूंबियांच्या विविध कार्यक्रम संम्पन्न होत असत पण अनेक दिवसांपासून सत्ताधारी नगराध्यक्ष व प्रशासकीय अधिकारी यांनी सपशेल दुर्लक्ष केले व यांच्या निष्काळजी पणा मुळे या सभागृहात जनावरांची विष्ठा , कुत्रे , गुरे ,ढोरे ,यांचा वावर होत आहे जे सभागृह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधे साठी बनवलेले आहे ते सभागृह फक्त शोभेची वस्तु बनली आहे या आधी सुद्धा चर्मकार समाज बांधवांनी अनेक वेळा निवेदन सादर केले पण त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही .याच सभागृहात संत शिरोमणी रोहिदास महाराजांची मूर्ती असून या मूर्तीच्या अवतीभवती संपूर्ण घाण साचलेली आहे तसेच संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची विटंबना होत आहे. त्याच बरोबर तेल्हारा येथील वैकुंठ धाम येथे अनेक वर्षांपासून संत रोहिदास महाराजांची मूर्ती एका खोलीत टाकून त्यामध्ये घाण साचलेली आहे ही बाब सुद्धा चर्मकार बांधवांनी उघडकीस आणली आहे .या वेळी
संतप्त झालेल्या चर्मकार समाज बांधवांनी थेट मुख्यधिकारी यांचे कार्यलय गाठून त्वरित संत रोहिदास महाराज यांच्या मूर्ती ची विटंबना होत असून त्याबाबत निवेदन सादर केले आहे व त्वरित संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीची स्वच्छता व देखभाल करण्यात यावी अन्यथा चर्मकार बांधवांच्या वतीने पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात येईल असा इशारा सर्व चर्मकार समाज बांधवांनी दिला आहे.
तेल्हारा शहरातील सद्यस्थितीत एकही सामाजिक सभागृहात सुव्यवस्था नसतांना सर्व सभागृहात घाणीचे साम्राज्य साचलेले आहे त्याकडे नगराध्यक्षा व मुख्यधिकारी यांचे दुर्लक्ष आहे पण नवीन सभागृह निर्मिती साठी मात्र पुढाकार घेण्यात येतो त्यामुळे हा पुढाकार कशासाठी असा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडला आहे .यावेळी संजय मस्तूद, गजानन रेवस्कर ,अडव्हाकेट जितेंद्र काकडे ,वासुदेवराव टाले , सचिन थाटे, पवन कामटे, राजू गायकवाड, गणेश सिसोदिया, गणेश काकडे,चंद्रकांत मोरे, मंगेश गायकवाड,नरेश थाटे, धनराज मेश्राम,जयराम शेवाळे, निलेश धारपावर, वाडेकर ताई,ज्ञानेश्वर गायकवाड ,यांच्या सह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.
:::::::::;::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
दखल न घेतल्यास पोलिस स्टेशन मध्ये करू तक्रार … संजय मस्तुद
संत रोहिदास महाराज समाज सभागृह येथील संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीची विटंबना होत असून त्वरित तेथील स्वच्छता करुन देखभाल करण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्या नावे पो.स्टे. येथे सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीने तक्रार करण्यात येईल.-
संजय मस्तूद
तालुका अध्यक्ष सकल चर्मकार समाज महासंघ