अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल चर्चेत असलेले पोलिस पाटील प्रकाश वासूदेव उगले यांनी रेतिचा ट्रक्टर कारवाई होण्याच्या आधीच परसस्पर सोडून पदाचा दुरुपयोग केला होता.या बाबत बोर्डी मधुन पालकमंत्रि,जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे लेखी तक्रार दाखल देण्यात आली होती.त्या तक्रारची दखल घेत पालकमंत्रि यांनी उपविभागिय अधिकारी अकोट यांना चौकशीचे आदेश दिले होते.त्या वरुन उपविभागीय अधिकारी अकोट यांनी तहसीलदार अकोट यांना सर्वीस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कळविले होते.त्या वरुन तहसीलदार अकोट यांनी चौकशी करून पोलिस पाटील यांनी रेतिचा ट्रक्टर परसस्पर सोडुन पदाचा दुरुपयोग केला आहे.तरी त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल सादर केला होता.त्या अहवाल वरुन उपविभागीय अधिकारी अकोट यांनी अर्जदार,गैरअर्जदार,तत्कालीन तहसीलदार राजेश गुरव तिघांनाही नोटिस बजावण्यात आली होती.त्या नोटीस प्रमाणे सुनावनीला अर्जदार हे हजर होते.गैरअर्जदार पोलिस पाटील हे गैहजर होते.व तत्कालीन तहसीलदार राजेश गुरव यांनी जबाब दाखल केला होता.तरी शेवटची सुनावनी घेवून प्रकरण आदेश करीता बंद केले होते.अखेर दी.29/10/2020 ला उपविभागीय अधिकारी अकोट यांनी आदेश पारीत केला आहे.व आदेशात नमुद केले आहे की प्रकाश वासूदेव उगले पोलिस पाटील बोर्डी यांचेकडे सुपूर्द केलेले वाहन रस्त्यावर उभे होते.परंतू गावातील येजा करण्याचा रस्ता असल्याने त्यांनी ते वाहन त्यांचे मालकीचे शेतात उभे केले होते.या बाबत पोलिस पाटील उगले यांनी सबंधीत तहसीलदार,तलाठी,यांना अवगत करणे गरजेचे होते.परंतू त्यांनी तसे केले नाही त्यांचे हे वर्तन पदाला साजेसे नाही.त्यांनी आपल्या कर्त्यवात कसूर केल्याचे स्पस्ट होत आहे.त्यामूळे बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाश वासूदेव उगले यांचे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम 1967 नुसार कर्त्यवात कसूर केल्याने माहे आक्टोंबर 2020 चे एक महिन्याचे मानधन कपात करण्याचे आदेश पारीत करण्यात येत आहे.असा आदेश दिला आहे.व आदेशाच्या प्रतीलीपी पालकमंत्री,जिल्हाधिकारी,ग्रामीण ठाणेदार,अर्जदार,गैरअर्जदार,यांना पाठविण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया.
गेल्या आठ महिने पासुन चर्चेत असलेले बोर्ड़ीचे पोलिस पाटील प्रकाश वासुदेव उगले यांनी ताब्यात असलेला रेतिचा ट्रक्टर कारवाई होण्याच्या आधीच परसस्पर सोडला होता.त्या बाबत मी तक्रार दिली होती.तरी त्यांंना दोषी ठरवुन आज उपविभागीय अधिकारी अकोट यांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन कपात करण्याचा आदेश दिला व मला खरा न्याय दिला आहे.
तक्रारदार देवानंद खिरकर बोर्डी.