अकोला (प्रतिनिधी)- राज्यसरकाच्या विरोधात सोशल मीडियावर टीका केली म्हणून संमित ठक्कर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला आतंकवादी असल्या सारखी वागणूक देणाऱ्या राज्यसरकाच्या निषेध म्हणून आणि दोन दिवसां आधी जम्मू काश्मीर मधील भाजप युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांची आतंकवाद्यांकडून हत्त्या करण्यात आली या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून बार्शीटाकळी येथे भाजयुमो बार्शीटाकळी तालुका ग्रामीण तर्फे निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी भाजयुमो तालुका अध्यक्ष योगेशभाऊ कोंदकर,भाजप तालुका अध्यक्ष राजूभाऊ पाटील काकड,संजयभाऊ इंगळे,वैभव करपे,शुभम रिसोडकर,राहूल राठोड,सुरज शिंदे,शाम ठाकूर,शंकर जाधव,मनीष इंगळे,विनोद जाधव,श्रीकांत गवई,अमोल गवई,बाळू इंगळे,शंकर पाटील,शाम महल्ले,दीपक पवार,परमेश्वर पवार,सतीश काकड,अक्षय शेळके,निखिल वाटमारे व कार्यकार्ते उपस्थित होते.