पातुर (सुनिल गाडगे): पातुर शहरात असलेल्या पेशवेकालीन वेशींना पुनर्जिवित करण्यासाठी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांच्या पत्रावर पातुर विकास मंचचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी केन्द्रीय मंत्री संजय धोत्रे यांना दिलेल्या निवेदना नुसार पत्र जावक क्रमांक ७३७ दिनांक ०५ आॅक्टोंबर २०२० आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२० ला केन्द्रीय पुरातत्व विभागाचे संतोष महाजन यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिति ने पातुर नगरपरीषद मुख्याधिकारी सोनाली यादव , गटनेता सैय्यद बुरहान ठेकेदार , आरोग्य सभापती सैय्यद फैय्याज , बांधकाम लिपिक प्रमोद घोळे व पातुर विकास मंचचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस , जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले , भारतीताई गाडगे , किरण निमकंडे यांच्या उपस्थितीत पातुर शहरातील बाळापुर वेस , शाहबाबु वेस , गोंड वेस यांची पाहणी केली.
आलेल्या केन्द्रीय पुरातत्व पथकाचे नगरपरीषद मुख्याधिकारी सोनाली यादव , बांधकाम सभापती तुळसाबाई गाडगे आणी सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या काळात शहरात इतिहास कालिन काही दुर्मिळ अशा वास्तू या नामशेष मात्र राहिलेल्या आहेत,त्यांचे जतन व पुर्नवसन करून ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा कसा कायम राहिल व येणा-या पिढीला गत वैभवाची साक्ष अनुभवण्याकरता ठाकुर शिवकुमारसिंह बायस आणी गणेश गाडगे यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना जनमानसात व्यक्त होतांना दिसत आहे.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश गाडगे , पुंडलिक श्रीनाथ , महेंद्र ढोणे , योगेश फुलारी , सचिन परमाळे , बंडू परमाळे , नितिन वानखडे , अक्षय निमकंडे , अतुल बायस , अविनाश बायस , रवी श्रीनाथ , मधू राखोंडे , विलास हिरळकार , शुभम सौंदळे , सपनाताई राऊत , संगिता इंगळे , देवकाबाई खंडारे , लक्ष्मीबाई गाडगे , नंदू कुटे , दिलिप बायस , बबलू बायस व परिसरातील बहुसंखेने नागरीक उपस्थित होते.
वेशींना गत वैभव प्राप्त होत असल्याचे समाधान शहरातील प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहेत.