तेल्हारा (प्रतिनिधी) – वीज चोरी प्रकरणात पुराव्यासह तक्रार दिल्या वर देखील अवैध वीज चोरी विरुद्ध कार्यवाही करण्यास हिवरखेडचे अभियंता कुमार टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे वंचित बहूजन आघाडी तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी संतप्त झाले.वंचीत पदाधिकारी ह्यांनी वीज मंडळाचे कार्यालयास बेशरमचे तोरण लावून निषेध व्यक्त केला.
वीज चोरी करणाऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी न्यायाधीश सारखी भूमिका घेऊन वीज मंडळ अभियंता कुमार ह्यांनी मर्यादा पार केल्या आहेत. एका तरुण मुलीचा बळी गेला असताना आरोपी बाबत सहानुभूती दाखविणे मागे त्यांना आर्थिक लाभ झाला असल्याचे सिद्ध करतेपुन्हा जर कुमार ह्यांनी पक्षाबद्दल बेताल वक्तव्य केले तर त्याला वंचित च्या स्टाईलने उत्तर दिले जाईल.ह्याचे भान राखून या पुढे वक्तव्य करावे असा इशारा देखील वंचित बहूजन आघाडी पदाधिकारी ह्यांनी दिला आहे.कुमार हे वीज चोरांना सहकार्य करीत असून आकोडे टाकून चोरी करणाऱ्यास आकोडे काढून पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत आहेत, असा आरोप देखील वंचितने केला आहे. ह्या आंदोलनात अशोक दरोकार, प्रकाश खोब्रागडे, विकास पवार, सतीश मामनकार,रोशन दारोकार आकाश जसनापुरे, प्रशांत गावत्रे, किशोर सरदार,नरेश बांगर,भाऊराव थोरात मोहम्मद राजीक लखन सोनटक्के मो जमादार, मो राजीक रवी गावंडे आदी उपस्थित होते.
बेशरम चे झाड लावताच वितरण कँपणीचे अधिकारी तळेगाव येथे दाखल झाले असून या प्रकरणात कोणती भूमिका अधिकारी घेतात याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे