दानापूर ( सुनिलकुमार धुरडे.)- यावर्षी झालेल्या जोरदार पावसाने आधी सोयाबीन ,ज्वारी, मुंग ,उडीद हे हिसकावून नेले . त्यानंतर शेतकरीराजाला विश्वसच एकच पीक हातच उरलं होत ते म्हणजे कपाशी मात्र त्यावरही बोंड अळीने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
चागलवाडी,दानापूर व परिसरातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर बोड अळी आल्याने शेतकऱ्याच्या हाताशी आलेल उत्पन्न ही नेस्त नाभूत होताना दिसत आहे.
चागलवाडी येथिल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आज तेल्हारा तहशिलदार यांना निवेदन देऊन बोंड अळीने नेस्त नाभूत झालेल्या कपाशी पिकांचा त्वरित पंचनामे करून भरीव मदत दवण्यात यावी .
करावा अशी मागणी चंगलवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी तेल्हारा तहशिलदार यांना दिलेल्या निवेदनात धम्मपाल वाकोडे, मंगेश डवले,नलुबाई वाकोडे, दादाराव पाखरे, प्रल्हाद वाकोडे, रमेश गळसकार, बळीराम वाकोडे, शे, रफिक ,शे, गफूर, देविदास राऊत आदी शेतकऱ्याच्या सह्या आहेत.