तेल्हारा (प्रतिनिधी)- दोन महिन्यापूर्वी केलेली मागणी पूर्ण न झाल्यामुळे आज २ नोव्हेबरला पुन्हा तेल्हारा शहरातील सर्वच सामाजिक सभागृहानची झालेली दयनीय अवस्था पाहता त्या सभागृहानची दुरुस्ती करून तेथे नागरिकांना पुरेश्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन शिवसेना व युवासेनेने नगराध्यक्षा उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला देऊन मागणी केली .
तेल्हारा शहराच्या नगराध्यक्षा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर किती गंभीर आहेत व त्यांना किती जाणीव आहे याची प्रचिती अनेक वेळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी पाहली आहे.अनेक वेळ निवेदन सादर करते वेळी शहराच्या नगराध्यक्षा हजरच राहत नसल्याने शेवटी नगराध्यक्षाच्या दालनात जाऊन खुर्चीला शिवसेनेने निवेदन दिले
तेल्हारा शहरातील सर्वच सामाजिक सभागृहानची दयनीय अवस्था झाली आहे . राजपूत धर्मशाळा , श्री शिवाजी मानवता समाज मंदिर , भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह , संत रविदास महाराज सभागृह , लोकशाहीर अन्नभाऊ साठे सभागृह , शहरातील इत्यादी सभागृहाची अत्यत दयनीय अवस्था झाली आहे. या सभागृहात सर्वत्र अस्वछता असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही , स्वछतागृहात घाण पसरली असून काही ठिकाणी ते तुटलेल्या अवस्थेत आहेत , सभागृहानचे दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहेत , लाईटची पुरेशी व्यवस्था नाही सभागृहतील काही पंखे बंद असून काही तुटलेले आहेत , रंगरंगोटी होत नसल्यामुळे सभागृह भकास दिसत आहेत तसेच सभागृहानच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुंळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .इत्यादी समस्या सदर सभागृहात आहेत या सभागृहानकडे नगर पालिकेचे सपशेल दुर्लक्ष होत आहे . महत्वाचे म्हणजे सदर सभागृहात गोरगरिबांनचे लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम होत असल्यामुळे नगर परिषद कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे हा गरिबांनवर एक प्रकारे अन्याय केल्या जात आहे . श्री शिवाजी मानवता समाज मंदिराचे काम निघाल्या वर व ठेकेदार करण्यास तयार असतांना सुद्धा अधिकारी पदाधिकारी यांनी ते होऊ दिले नाही यावरून नगर परिषद चे पदाधिकारी हे गोरगरिबांनप्रती किती संवेदनशील आहेत हे दिसून येते नगर परिषदच्या अधिकारी व पदाधिकारी यांचे नेमके लक्ष कोठे आहे हे समजन्यपलीकडे गेले असे कोणी समजू नये वेळ आली कि ते सुध्दा आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू , तरी नगर परिषद च्या अधिकारी व पदाधिकारी यांनी शहरातील सभागृहानकडे लक्ष देऊन दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर करण्यात यावे . ज्या मटण मार्केट मध्ये एकही बोकळ कापल्या जात नाही कोणीही तेथे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करीत नाही त्या आठवळी बाजारातील मटन मार्केटची दुरुस्ती करिता लाखो रुपये खर्च केल्या गेले यावरून नगर पालिकेचा कारभार कसा ढेपाळला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. कर द्वारे जमा होत असलेल्या नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग केल्या जात आहे. हे सिद्ध झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून सभागृहानच्या दुरुस्तीचे कामें लवकरात लवकर करावे अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला तसेच गोरगरिबांनसाठी केलेल्या आंदोलना मधून काही घळल्यास त्याला नगराध्यक्ष व नगर परिषद जबाबदार राहणार आहे असे सुद्धा निवेदनातुन नमूद करण्यात आले आहे . या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड , शहर प्रमुख विक्रांत शिंदे , माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , उपतालुका प्रमुख अजय गावंडे , युवासेनेचे जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर , विवेक खारोडे , संतोष राठी , पंकज कंवर , अमर ठाकुर , गजानन मोरखडे , संभाजी वानखड़े , इत्यादी शिवसेना व युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
:::::::::::::::::;;;::::::::::::::::::::::::::::::::::
तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा अनेकवेळा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला हार घालावा लागला . नगराध्यक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन सोडवणे या जवाबदारी पासून सपशेल दुर्लक्ष करून पळ काढत आहेत शेवटी खुर्चीला निवेदन देऊन लक्ष वेधले आहे सदर प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईल ने तीव्र आंदोलन करण्यात येईल
विक्रांत शिंदे
शिवसेना शहर प्रमुख
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::