अकोला – तेल्हारा तालुक्यातील तळेगाव (बाजार) येथील
अन्यायग्रस्त कुटुंबास राजेंद्रभाऊ पातोडे (वंचित प्रदेश प्रवक्ता तथा वंचित बहुजन युवक आघाडी राज्य महासचिव) यांनी भेट देऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यास पोलीस प्रशासनास भाग पाडू असे आश्वासन दिले.सोबतच सदर तरुणीचा विनयभंग झाला असताना अन्यायग्रस्त तरुणीचे नातेवाईक व शेजारी असलेल्या अनुसूचित जातीच्या चार तरुणांना खोट्या तक्रारीच्या आधारे आरोपी करणाऱ्या व सदर तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपी व त्याचे नातेवाईक ह्यांना हिवरखेड ठाणेदार लवंगरे ह्यांनी पायबंद घातला नाही.त्यामुळे विनयभंग केलेल्या आरोपीच्या भाऊ व नातेवाईक ह्यांनी तरूणीला धमकाविले शिवाय तिचे भाऊ व वडिलांना खोटया पोलीस तक्रारीत अडकविण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याने पिडीत तरुणीने आत्महत्या केली.ह्या प्रकरणात ठाणेदार लवंगारे ह्याला अट्रोसिटी चे कलम ४ प्रमाणे सह आरोपी करण्यासाठी उद्या तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांचे कडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय पीडितेचे कुटुंबातील आक्रोश पाहता घेतला गेला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अशोक दारोकार, विकास पवार, सुदर्शन बोदडे, सचिन शिराळे, पं समिती सदस्य ईद्रीस भाई, सुभाष भड, मोहम्मद राजीक आदींची उपस्थिती होती