अकोट(देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथिल सावकार ग्रस्त शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांची 1.62.आर जमीन ही धारूळ उर्फ रामापुर शिवारात असुन सदर शेती ही सरीता विजय चांडक यांच्या नावे आहे.परंतू या शेतीचे वाहीतीदार 20/4/1998 पासुन रमेश रामचंद्र खिरकर हेच आहेत.तरी सदर शेताची दुष्काळी अनुदानाची 12,800 रुपये रक्कम ही चुकून सरीता विजय चांडक यांच्या नावाने टाकण्यात आली होती.ती 12,800 रुपये रक्कम चांडक यांनी तहसीलदार अकोट यांचे नावे परत केली होती.ती दुष्काळी अनुदानाची मदत वाहीतीदार रमेश रामचंद्र खिरकर यांना पाहीजे होती.या बाबत रमेश रामचंद्र खिरकर यांनी मी दुष्काळी अनुदाना पासुन वंचित असुन मला दुष्काळी अनुदानाची रक्कम देण्यात यावी.अशी लेखी तक्रार तहसीलदार अकोट यांचेकडे केली होती.त्या तक्रारची दखल घेत तहसीलदार अकोट यांनी सदर शेत हे कोणी पेरल,कोणाच्या ताब्यात आहे.या बाबत मंडळ अधिकारी व तलाठी रामापुर यांना लेखी पत्र दिले व पंचनामा करुन सर्वीस्तर अहवाल सादर करावा असे कळविले होते.त्या पत्राप्रमाणे मंडळ अधिकारी नेमाडे,व तलाठी ईचोले यांनी खिरकर व चांडक यांना नोटीस बजावली होती.व सर्व कागदपत्रासह मोक्यावर हजर रहावे असे कळविले होते.त्यावरुन सदर शेताचा वाहीती बाबत,व शेती ताब्या बाबत पंचनामा करण्यात आला.यावेळी पंचनाम्यावर हजर रमेश रामचंद्र खिरकर,देवानंद रमेश खिरकर,रमेश हरीनारायण सरपे,दिपक जगन्नाथ खिरकर,किशोर गावंडे,अरुण शामराव चामलाटे,पुंडलिक बोरोकार,प्रकाश टेकाम,मंडळ अधिकारी नेमाडे,तलाठी खामकर,तलाठी ईचोले,यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे.