अकोला,दि. 29(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 115 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 28 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 51 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 27 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 115 चाचण्यांमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21424 चाचण्या झाल्या त्यात 1491 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.