अकोट दि 29 शासन निर्णयची अंबलबजावणी करने बाबत . शासकीय सोईसुविधे करिता शपथपत्रे ऐवजी स्वयघोषणापत्र व कागद पत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारण्याच्या अनुषंगाने व शिधापत्रिकेसंदर्भात करण्यात येणाऱ्या विविध अर्जाचे नमुने त्यातील अनावश्यक मुद्दे वगळून एका पानाचे करण्याबाबतचे निर्देश शासना मार्फत करण्यात आले होते परंतु निर्देशनाचे पालन आकोट तहसील पूरवठा विभाग तर्फे व अन्यत्र कर्मचारी मार्फत होताना दिसून येत नाही या मुळे सर्व साधारण जनतेला त्रास होतांना दिसून येत आहे तसेच पुरवठा विभागातील शिधापत्रिका संबंधित सर्व प्रकारचे अर्ज हे एका पानाचेच घेण्यात यावे असे शासनाच्या शासन निर्णयात नमूद केले आहे तरीही लोकांची दिशाभूल करून आपल्या कार्यालयातील कर्मचारी 2 रुपयाच्या अर्जा ऐवजी 20 रुपयांचे अर्ज घेण्यास भाग पाडत आहेत व शासनाने दिलेल्या निर्देशांची अवहेलना होताना दिसून येत आहे, तरी शासन निर्णय मध्ये नमूद असलेले अर्ज स्वीकारण्यास आपल्या मार्फत आदेशित करावे, शासन निणर्याचे निर्देशांचे पालन जर आपल्या तहसील मधील पुरुवठा विभाग कडून न ” झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व नुकसानास सर्वस्वी जबाबदरी हि आपली राहील. हे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष सुरज वर्मा यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पवन नागले,शुभम देशपांडे, शुभम गोंडचर,तेजस लेंघे,अनंता थोरात,गुड्डू गुजर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते