चोहोटा बाजार ( पुर्णा खोडके)-सतत विदर्भाच्या विकासाच नेतृत्व करनारे व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण व अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने एक चांगला सहकारी आपण गमावला आहे अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर विश्व हिंदू परिषद रामजन्मभूमी आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसेच रामनवमी शोभायात्रा समितीचे संस्थापक सदस्य सितारामजी ढोणे यांच्या संस्कारात सामाजिक राजकीय वाटचाल करणारे विदर्भवादी नेते जगन्नाथ ढोणे आपले सहकारी यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जिल्ह्याच्या प्रत्येक समाजाची एक रूप होऊन भाजपा विस्तारासाठी सदैव कार्यरत तसेच सिंचना विषयी जागृत नेतृत्व प्रखर वक्ते डॉक्टर जगन्नाथ जी ढोणे यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली अशा शब्दात जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसेच शेतकरी शेतमजूर व विकासाचा दृष्टिकोन ठेवून आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामगिरी करणारे जगन्नाथ ढोणे आपले सहकारी निघून गेल्याने ही हानी न भरून निघणारी असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केली व श्रद्धांजली अर्पण केली ज्येष्ठ मार्गदर्शक व ओबीसी मागासवर्गीयांच्या समस्यांनी निराकरणासाठी सदैव तत्पर असणारे डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली तर माळी समाज सोबत अठरापगड जाती बारा बलुतेदारांच्या समस्या याची जाण असणारा व जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सकारात्मक बाबी चा विचार करणारे डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात महापौर अर्चनाताई मसने यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात यांनी आपल्या शोक संदेशात त्यांच्या निधनाने आपण एक ज्येष्ठ सहकारी मित्र व पक्षाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणारा शैक्षणिक आरोग्य राजकिय सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर ढोणे यांच्या निधनाने फार मोठी हानी खाली अशा शब्दात त्यांनी आपली श्रद्धा व्यक्त केली तर भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी शेतकरी शेतमजूर ग्रामस्थ सोबत विकासाचा संदेश घेऊन नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांनी पक्षाच्या विचार धोरणाशी अंगीकार करून प्रदेश कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून तसेच सिंचन क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करून शेतकरी समृद्ध होण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या अभ्यासू नेतृत्व निघून गेल्यामुळे पक्षाची फार मोठी हानी झाली अशा शब्दात त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली रमण जैन अमोल साबळे मनोहर राहणे हरिनारायण माकोडे सिद्धार्थ शर्मा गिरीश जोशी गणेश पोटे अनिल गासे जयंत मसने मनीराम टाले श्रावण इंगळे शंकरराव वाकोडे बाळासाहेब आपोतीकर शिवाजीराव देशमुख प्रभाकर मानकर नयना ताई मनात कर कुसुमताई भगत चंदाताई शर्मा गीतांजली शेगोकार अश्विनी हातवळणे सुमन ताई गावंडे योगिताताई पावसाळे बाळासाहेब नेरकर कृष्नाभाऊ तिडके जयश्री पुंडकर मोनिकाताई गावडे रमेश दुतोंडे उमेश पवार डॉक्टर मनमोहन व्यास डॉक्टर किशोर मालोकार आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली