अकोला,दि. 28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 122 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे एक चाचणी झाल त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 39 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 47 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 122 चाचण्यांमध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21336 चाचण्या झाल्या त्यात 1481 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.