• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतक-या साठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन हास्ययास्पद – राजेंद्र पातोडे.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 28, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
वर्क फ्रॉम होम
17
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.- २८ – शेतक-यांना घरी बसून शेतीची काही कामे करता येतील का अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’ साठी कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा आराखडा तयार करावा असे आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ऑनलाईन सभेत केले आहे.मुख्ममंत्र्यांचे हे आवाहन शेती आणि शेतक-यांची थट्टा करणारे आणि हास्यास्पद असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.घरात बसवून सरकार चालविण्यासारखा शेती करण्याचा अफलातून सल्ला शेतीची काडीचाही संबंध नसलेली राजकारणीच देवू शकतात.हे आघाडी सरकारच्या प्रमुखांनी सिद्ध केले आहे, असा टोला देखील वंचितने लगावला आहे.

शेतक-यांना घरी बसून शेतीची काही कामे करता येतील का अर्थात ‘वर्क फ्रॉम होम’ साठी कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा आराखडा तयार करावा असे आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी डॉ पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ आणि महारष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या ‘कृषी संशोधन आणि विकास समितीच्या २०२०’ च्या ४८ व्या ऑनलाईन सभेत केले आहे.मुख्ममंत्र्यांचे हे आवाहन अनाकलनीय असून सरकारच्या शेतकरी विषयक अनास्था व अज्ञानाचे उघड प्रदर्शन करणारे आहे.घरी बसून शेती करणे म्हणजे घरी बसून सरकार चालविण्यासारखे असेल असा काही तरी गैरसमज मुख्यमंत्र्यांना झालेला दिसतो.शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे ऑनलाईन कशी करता येतील ? असा प्रश्न असून जगात कुठल्याही देशात नसलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचा हा अफलातून सल्ला आहे.
मुख्यमंत्र्याना आठ दिवसा पूर्वी त्यांनीच केलेल्या विधानाचा विसर देखील पडलेला दिसतो.शेतक-यांना वर्क फ्रॉम होमचा आराखडा सादर करण्याचे आवाहन करणा-या मुख्यमंत्र्यानी तारखेला ” तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो ” ह्या मोहिमे संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला संबोधन केले होते.त्यामध्ये ” माझा शेतकरी गरीब आहे, तो वर्क फ्रॉम होम करू शकत नाही” असे विधान केले होते अवघ्या आठ दिवसातच मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांची गरीबी दूर केलेली दिसते.कारण आठ दिवसा आधी शेतकरी गरीब असल्याने वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, अशी मांडणी करणारे मुख्यमंत्री आता कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतक-यांसाठी वर्क फ्रॉम होम चा आराखडा मागत आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

हा सर्व प्रकार सरकारची शेती आणि शेतक-या बाबतची अनास्था आणि अज्ञान प्रकट करणारे असून सरकारने असे जादूचे प्रयॊग थांबवून शेतकरी कष्टकरी कसा जगेल, त्याच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, अतिवृष्टी, पूर आणि अवकाळीने उध्वस्त झालेला शेतकरी आपल्या पायावर उभे करण्यासाठी जुमलेबाजी न करता भरीव मदत तातडीने त्याचे बँक खात्यात जमा करावी असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
असे वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे ह्यांनी कळविले आहे.

Tags: राजेंद्र पातोडेवर्क फ्रॉम होम
Previous Post

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला टाटा कंपनीच्या  गाडीची जबरदस्त धडक  , एक  गंभीर जखमी

Next Post

आघाडी सरकारच्या अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला —जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आरक्षण

आघाडी सरकारच्या अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला ---जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर

जिल्हाधिकारी

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आधार कार्ड व बॅंक खाते उघडून गर्भवती मातांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.