अकोला,दि. 27(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 152 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथून सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 46 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 59 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 152 चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21214 चाचण्या झाल्या त्यात 1476 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.