तेल्हारा(विलास बेलाडकर)- जि.प.शाळा दहिगाव पं.स.तेल्हारा,शाळेत एकूण 1 ते 8 पर्यत वर्ग आहेत.पटसंख्या भरपूर आहे.करोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे.कार्यरत शिक्षक आपापल्या कल्पकतेने उपक्रम राबवित आहेत.
या शैक्षणिक उपक्रमात गावातील माता भगिनीची खुप साथ मिळत आहे.कु.देवकी कळसकार शिक्षिका यांनी गावात ‘एका मेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे शिक्षिका आणि पालक,यांनी संगनमताने गावात हा ‘माता पालक वर्ग’ सुरू केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाईनी घरातून शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला होता.त्याचप्रमाणे सौ.पूजा विनोद चिकटे,दुर्गा विनोद अवताडे,कु.दामिनी सिरसाट ह्या आज गावात सावित्रीच्या लेकी त्यांच्या घरात मुलांना बोलावून शिक्षणाचे धडे देत आहेत.शाळा घरातच भरवली.करोना काळात सुरक्षिततेचे सर्व नियमाचे पालन करत (मास्क बांधणे, सॅनीटायझर वापर,बसताना सुरक्षित अंतर ठेवणे)अभ्यास घेत आहेत.
उपक्रमाची कार्यवाही-कु.कळसकार मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली हा वर्ग घेतला जातो.मॅडम त्यांच्या घरातूनच ताईंना कॉल करतात.ताई कॉल रिसीव्ह करतात.मूल गोलाकार बसवून फोन त्यांच्या मधोमध ठेवलेला असतो. स्पीकर ऑन असल्यामुळे आवाज सर्वाना स्पष्ट ऐकू येतो.प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात होते.ताई मुलांच्या चुकांकडे लक्ष देतात.व मॅडमला सांगतात.दुरुस्त करून घेतात.वाचन, लेखन,गणित,होमवर्क तपासणे सर्व ताई करतात.मॅडम दर गुरुवारी वर्गाला भेट देतात.पूजा ताईंनी शैक्षणिक चार्ट सुद्धा तयार केलेले आहेत.आम्ही वर्ग घेतो म्हणजे पुण्याचं काम करत आहोत असं ताई सांगतात.खरोखरच या लेकीचं कौतुक करावे तेवढं कमीच.
या उपक्रमात स्मार्ट फोनचा वापर नाही.केवळ दोन मोबाईलद्वारे 35 पैकी 30 विद्यार्थी शिकत आहेत.9 ते 10 मूल एकत्र येत असल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली.खेळणारी मुले एकत्र अभ्यासाला बसली.यातच खरा आनंद आहे.
कु.शुभदा वानखडे मॅडम सुद्धा झूम मीट द्वारे अध्यापन कार्य करत आहे.पालकांना खरोखर आनंद होत आहे की आमची मुले शाळा बंद आहे तरी शिक्षण घेत आहेत.
त्यावेळी गावचे उपसरपंच स्वप्नीलभाऊ भारसाकळे, विनोद चिकटे,कु शुभदा वानखडे,सौ.लता भारसाकळे,सागर खराटे व इतर उपस्थित होते.
(“या उपक्रमात स्मार्टफोनचा वापर नाही. केवळ दोनच मोबाईलद्वारे अध्यापन कार्य करत आहे. पालकांना खरोखर आनंद होत आहे की आमची मुले शाळा बंद असली तरी शिक्षण घेत आहेत”)
कु. कळसकार (मॅडम) जि. प शाळा दहिगाव