अकोट(देवानंद खिरकर)- शिवसेना उपजील्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्याकडे आकोट तालुका प्रमुख शाम गावंडे व आकोट शिवसेना माजी उपशहर प्रमख विजय ढेपे यांनी या बाबत संबधीत वरीष्ठानकडे पाठपुरावा केला.त्यांनी सबंधीत विभागाशी ओ.बी.सी.विद्यार्थ्यांची शिष्यवृती अर्जाची तारीख वाढण्यासाठी पाठपुरावा केला असता शिष्यवृत्ती विभागाने ही तारीख वाढवून दिली आहे.तरी संबधित विद्यार्थ्यांनी शाळेत,काॅव्हेटमधे अर्ज सादर करावेत.आकोला जिल्हातील सर्व ओ.बी सी.मुलांना शिष्यवृती मिळण्यासाठी जी अर्ज भरण्याची तारीख १२ ऑक्टोबर २०२० ही होती ती वाढवून आता दि..26/10/2020 या तारखेपर्यंत वाढली आहे.या बाबीचा पाठपुरावा शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी समाज कल्याण अधीकारी केदार मॅडम यांच्याची वेळोवेळी संपर्क साधुन ही तारीख वाढविण्यासाठी पाठपुरावा केला.काॅव्हेटमधे पालकांनी आतापर्यंत पाल्ल्यांची फी भरली नसेल तरी कोणताही विद्यार्थी हा ओ.बी.सी.शिष्यवृती फार्म भरण्यापासुन वंचीत राहणार नाही. याची सर्व जबाबदारी सबंधीत संस्था शाळेची राहील असा इशारा शिवसेना उपजील्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दिला आहे.याबाबत पालकांना काही अडचण आल्यास शिवसेना पदाधीकारी शिवसैनीक यांच्याशी संपर्क साधावा.आपणास शिवसेना सदैव सहकार्य करणार असे आश्वासन गोपाल दातकर शिवसेना निवासी उपजील्हाप्रमुख यांनी दिले आहे.