अकोला,दि.22(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 92 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 72 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एक मयत झाला.
त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जण व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8178(6605+1396+177) झाली आहे. आज दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42080 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 40998 फेरतपासणीचे 214 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 868 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41863 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35258 तर पॉझिटीव्ह अहवाल 8178(6605+1396+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 20 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरीत जैन मंदिर, रुख्मिणी नगर, जठारपेठ, मोठी उमरी, रामदासपेठ, बोरगांव मंजू, खांडला, शास्त्री नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड, खिरपुरी ता. बाळापूर, गणेश नगर, वाडेगाव ता. बाळापूर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
16 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12 जणांना, सुर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रिजेंसी येथून तीन जणांना, अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात शिवर, अकोला येथील 27 वर्षीय पुरुष असून तो दि. 20 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला
479 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8178(6605+1396+177) आहे. त्यातील 267 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7432 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 479 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.