अकोला,दि.21(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 185 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 165 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8145(6585+1390+170) झाली आहे. आज दिवसभरात 19 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42036 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 40956 फेरतपासणीचे 213 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 867 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41771 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35186 तर पॉझिटीव्ह अहवाल 8145(6585+1390+170) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 20 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रय नगर येथील तीन जण, सिंधी कॅम्प व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बाभुळगाव जहागीर, उमरी, मलकापूर, पिंपळखुटा, डाबकी रोड, न्यु मलसूल कॉलनी, बाळापूर, गोरे अर्पाटमेन्ट, खडकी खदान व शिवर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश आहे. मणकर्णा प्लॉट येथील दोन जण व ताजीपूर येथील एक जण या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
19 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जणांना, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून चार जण, कोविड केअर सेंटर येथून तीन जण, अकोला ॲक्सीडेंट हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर अवघते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून एक जणांना अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
463 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8145(6585+1390+170) आहे. त्यातील 266 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7416 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 463 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.