तेल्हारा(प्रतिनिधी)- शहराचे आराध्य दैवत शहराच्या मध्य भागी वसलेले सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान लटियाल भवानी मंदिरा मध्ये नवरात्र उत्सव सुरू असून सध्या संपूर्ण जगात थैमान मांडलेल्या कोरोना कोविड-19 या विषाणूच्या रोगाचे प्रादुर्भाव थांबविण्याकरिता शहराचे आराध्य दैवत श्री लटियाल भवानी आईला ललिता पंचमीच्या पावन पर्वावर पहाटे 4=00 वाजता महाअभिषेक करून महाआरती करण्यात आली.
यामध्ये सर्वप्रथम आई भवानीचे पंडित जितेंद्र प्रसाद छांगानीयांच्या पौरोहित्याखाली विधिव्रत पूजन करून नंतर मंदिराचे महंत पुजारी दिपकदास गुलाबदास वैष्णव यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला व नंतर महाआरती करून आई भवानीला महाभयंकर अशा रोगाचा प्रादुर्भाव थांबून सर्व जनतेचे कल्याण करून जनजीवन सुरळीत करण्याकरिता साखळे घालण्यात आले यावेळेस आशिष अशोक गाडोदिया , पंकज वैष्णव व बरेच महिला भक्त हजर होते.
यावेळेस सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पूजा संपन्न झाली अशी माहिती मंदिराचे महंत पूजारी दिपकदास वैष्णव यांनी कळविले.