तेल्हारा(विलास बेलाडकर)- दरवर्षी मोठ्या उत्साहात दहिगाव मध्ये जागृत हिंगळा माता (भवानी माता) मंदिर संस्थान दहिगाव येथे नवरात्र दोन उत्सव साजरे केले जातात एक अश्विन नवरात्र, दुसरे चैत्र नवरात्र या दोन्ही नवरात्रात महिला भजन मंडळ आयोजित केले जातात परंतु यावर्षी covid-19 प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नवरात्र उत्सव नवरात्र मधले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत मंदिर मध्ये दोन टाईम आरती पूजा-अर्चना सुरू राहील भाविक भक्तांनी मंदिरात येण्याचे टाळावे व मंदिरात गर्दी करू नये मंदिराच्या वतीने कळविण्यात आले असे आहे
ही गोष्ट जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वीची आहे दहिगाव तालुका तेल्हारा जिल्हा अकोला हे एक साधारण खेड्या पैकी एक खेडेगाव वजा गाव दहिगाव हे मोठे नगर नसले तरी शेती सुपीक पिकाऊ असल्यामुळे लक्ष्मी गावात नांदत होती पंचक्रोशीतील लहान-सहान खेडी सुद्धा गावाला व्यवसायाच्या माध्यमातून जोडलेली शेतीचे चांगले उत्पन्न निघत असल्यामुळे गावातच एक श्रीमंत शेडजी चा कापसाचा जीन पण होता हंगामाच्या दिवसात तर इतके गाव गजबजलेले वाटत होते की जणू एखादे नगरच
गावात पाटील, माळी, धनगर, मारवाडी, तेली, शिंपी, सोनार तसेच इतरही अनेक जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते या गावात श्री रामचंद्र पाटील म्हणून धनाढ्य असे एक गर्भश्रीमंत सद्गृहस्थ राहत होते गावात त्यांच्याकडेच पाटीलकी होती व त्यांचा गावात मोठा मान होता. दरवर्षीप्रमाणे पावसाळा संपला दसरा, दिवाळी गेली व कापसाचा हंगाम सुरू झाला कापसाचा जीन सुरू होणार म्हणून व्यापारी आले व त्या वर्षी कापूस खरेदीचा मुहूर्त नेमण्यात आला सालाबाद प्रमाणे कापसाच्या पहिल्या बंडीचे पहिले माप रामचंद्र पाटील करतील, असे ठरविले गेले. नियोजित दिनी रामचंद्र पाटील यांनी केशव भडजी यांच्या सांगण्यावरून बैलबंडीची यथोचित पूजा केली. व कापसाची फारी भरून आणावयास सांगितली. मजुरांच्या नेहमीच्या अंदाजाप्रमाणे कापसाची फारी भरली व काट्यावर लटकविण्यासाठी नेहमीप्रमाणे ताकत लावली, पण काय आश्चर्य! फारी उचलल्याच जात नव्हती. शेवटी निम्म्यापेक्षा जास्त कापूस कमी केला व मोठ्या ताकतीने फारी काट्यावर लटकवली. पाटील यांनी श्री गणेशा केला व फारीतील कापूस बाजूला टाकण्यास सांगितला आणि नेमके याच वेळी घडले. कापूस खाली टाकता बरोबर त्या कापसाच्या सोन्याचे; पण मूर्तीच्या आकाराचे काहीतरी आहे, असे पाटील यांना दिसले. पाटलांनी ती मूर्ती सर्वांना दाखवली. सर्वात मोठी मूर्ती निरखून पाहिली त्यावरुन तीन जवळजवळ 65 ते 70 तोळ्याची देवीची मूर्ती आहे, असे सर्वांच्या लक्षात आले. लगेचच त्यांचा कापूस होता त्या शेतकऱ्याला विचारले गेले तर तो सज्जन शेतकरी शपथपूर्वक सांगायला लागला की, ही मूर्ती माझे किंवा माझ्या घरची नसून आतापर्यंत एवढी मोठी मूर्ती मी कुठेच आणी कधीच पाहिली नाही. सर्वांनी भक्तिभावाने मूर्तीचे दर्शन घेतले. शेवटी रामचंद्र पाटील यांना सर्वप्रथम ती मूर्ती दिसली म्हणून त्यांनी ती मूर्ती घरी नेऊन देवघरात बसवावे, असे ठरले व त्यानुसार पाटील यांनी मूर्ती आपल्या घरच्या देवघरात बसवली. दररोज देवपूजेच्या वेळी त्याही देवीची पूजा केली जात असे; परंतु आपण आपल्या देवघरात ठेवलेले मूर्ती ही कुठली असावी व तिचे नाव काय बरे असावे? असा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. पाटील यांच्या मनात शंका दूर करण्याच्या हेतूनेच एका रात्री पाटील झोपले असताना त्यांच्या स्वप्नात देवीने साक्षात्कार दिला व माझे नाव हिंगळादेवी असून मी तुझ्या गावातच राहण्यासाठी व भक्तांना दर्शन देण्यासाठी आली आहे. म्हणून तू मात्र आता माझे स्वतंत्र असे मंदिर बांधून त्यात माझी प्राणप्रतिष्ठा कर, असे सांगितले. पाटील यांनी गावातील सर्व नागरिकांना देवीच्या स्वप्नातील साक्षात्कार सांगितला आणि मग पिंगळाई च्या आदेशावरून पाटील यांनी त्यांच्या वाड्यातच मंदिर बांधले
गावातील केशव भडजी च्या सांगण्यावरून चैत्र शु. पोर्णिमा (हनुमान जयंती) हा दिवस क्रांती प्राणप्रतिष्ठेचा नेमण्यात आला. थोड्याच दिवसात दूरदूरपर्यंत देवीची माहिती पसरली, त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पाटील यांच्या वाड्याभोवती यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या थाटात प्राणप्रतिष्ठा झाली व त्या दिवशी बाहेरच्या सर्व भक्तांना सांगण्यात आले की, दरवर्षी या तिथीला देवीचा उत्सव साजरा करण्याच्या हेतूने यात्रा भरवण्यात येईल
आमचे गाव आमचे श्रद्धास्थान
गावकर्यांनी सुद्धा जातीने भाग घेऊन महोत्सव संपन्न झाला. तेव्हापासून दर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गावाला साजेशी यात्रा भरायला लागली.
यात्रा म्हटली म्हणजे त्यात हौशे,नवशे गवशे आलेच; असे यापैकी कोणीही यात्रेला आलाच व त्यांच्या नजरेत ती 70 तोळ्याची सोन्याची मूर्ती बसली व संधी साधून त्याने ती चोरून नेली. बराच शोध घेऊनही मूर्ती मिळाली नाही. शेवटी पावन असलेल्या त्या जागी पितळेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून बसविण्यात आली. अशा या जागृत पिंगळा मातेचे दरवर्षी चैत्र शु. पौर्णिमेला (हनुमान जयंती) यात्रा भरत असते. परंतु यावर्षी चे वाढते प्रमाण पाहता असलेले नवरात्र उत्सव त्यात मंदिरात येणारे भाविक भक्त यांना येऊ नये असे सांगण्यात आले व मंदिरात सहकार्य करावे असे सूचना देण्यात आल्या. लांबलांबवरून भक्त दर्शनाला या दिवशी मोठ्या संख्येने येतात. याशिवाय नवरात्रात इतकेच नव्हे तर बारावी महिने दर मंगळवारी दर्शनाभिलाशी येत असतात गावातील जवळजवळ 75% महिला, पुरुष, मुले दररोज शक्य झाले नाही तर दर मंगळवारी घेऊन मोठ्या आदराने दर्शन घेतात व देवीचा मंगळवारचा उपवास करतात
परंतु ते आता या वाढत्या धोरणामुळे शक्य होत नाही.
दहिगाव ची हिंगळा माता ही जागृत देवी असून सर्वच भक्तांना पावणारी अशी आहे, असे श्रद्धाळू देवभक्त सांगतात. मुळचे संस्थापक रामचंद्र पाटील यांना दोन मुली होत्या मुलगा नव्हता मुली लग्न होऊन सासरी गेल्या व पाटील हे वैकुंठवासी झाले. परिणामी, त्यांच्या कुळातील अवचितराव पाटील यांनी मंदिराची व्यवस्था पाहिली. कालांतराने तेही स्वर्गवासी झाल्यामुळे आजच्या तीथीला त्यांचे चिरंजीव प्रशांतराव उर्फ छोटू पाटील हे मंदिराची काळजी वाहतात.
अशीही दहिगाव ची पिंगळाई ची माहिती दिवसेंदिवस वाढतच राहो व सर्वांच्या इच्छा-आकांक्षा देवी आता पूर्ण करो, हिच देवीच्या चरणी प्रार्थना. देवीचा नवरात्र उत्सव तथा चै. पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील आताचे पोलीस पाटील अरविंदराव अवताडे व ज्ञानेश्वर घंगाळ तसेच मंदिर परिसरातील कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असतो हे याठिकाणी उल्लेखनीय
“श्री भवानी मंदिर संस्थान दहीगाव येथे नवरात्र दोन उत्सव साजरे केले जातात अश्विन नवरात्र, दुसरे चैत्र नवरात्र या दोन्ही नवरात्रात महिला भजन मंडळ आयोजित केली जातात परंतु यावर्षी covid-19 प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे नवरात्र उत्सव मधले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत मंदिर मध्ये दोन टाईम आरती पूजा-अर्चना सुरू राहील भाविक भक्तांनी मंदिरात येण्याचे टाळावे व मंदिरात गर्दी करू नये”
पोलीस पाटील अरविंद अवताडे (दहिगाव)