अकोला(प्रतिनिधी)- गंगानगर अकोला येथील रहिवासी शे.दानिश शे.नईम वय अं.(23) वर्ष* हा युवक आपल्या दोन मित्रासह दगडपारवा ता. बार्शीटाकळी येथील धरणात पोहण्यासाठी उतरला असता अचानक पाय घसरून तो पुढे खोल पाण्यात गेल्याने क्षणातच पाण्यात बेपत्ता झाला कारण दानिशसह दोन्ही मित्रांना पोहणं येत नव्हते यामुळेच ही घटना घडली असावी याची माहिती सोबतच्या दोन्ही मित्रांकडून व नातेवाईकांकडुन बार्शिटाकळीचे ठाणेदार तीरुपती राणे साहेबांना मिळताच राणे साहेबांनी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दीली आणी लगेच सर्च ऑपरेशन साठी पाचारण केले. क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी उमेश बिल्लेवार,सागर आटेकर, अंकुश सदाफळे,धिरज राऊत,मयुर कळसकार, सुरज ठाकुर,ओम साबळे, मयुर सळेदार,शिवम वानखडे, हे सर्च ऑपरेशन साहीत्य घेऊन घटनास्थळी पोहचले. लगेच जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी घटनास्थळ ट्रेस केले असता जागेवरच 25-30 फुट खोल पाणी असल्याने तात्काळ अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन चालु केले यावेळी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशनसाठी पाण्यात असलेले जिवरक्षक दीपक सदाफळे,धिरज राऊत, अंकुश दीपक सदाफळे, उमेश बिल्लेवार यांच्या पैकी अंकुश सदाफळे याला खाली तळाशी मृतदेह टच झाला लगेच अंकुश वर आल्यावर जिवरक्षक दीपक सदाफळे यांना सांगताच स्पाॅट लोकेशन ट्रेस केले.आणी क्षणार्धात जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी अंडर वाॅटर जंप घेऊन बुडाशी असलेला मृतदेह वर आणला यावेळी घटनास्थळी ठाणेदार तीरुपती राणे साहेब आणी पोलीस कर्मचारी तसेच अकोला ट्राॅफीक पोलीस टीम व नातेवाईक हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.