पातुर(सुनील गाडगे) -पातुर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने या भागातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पातुर तालुक्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री आणि पालकमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्याकडे प्रहारचे अमोल करवते यांनी त्यांचे कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांना सोबत घेऊन पातुर चे नायब तहसीलदार आहे समृद्धी व साहेब यांना लेखी निवेदन देऊन ही मागणी केली आहे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा ला आधीच पातुर तालुक्यातील शेतकरी कंटाळा आला आहे असे असताना उडीद मूग सोयाबीन आणि कापूस ही पीके सुद्धा पावसामुळे खराब झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे म्हणून पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी जेणेकरून शेतकरी जीवन जगू शकतील पालकमंत्र्यांनी या बाबीची दखल घेऊन पातुर तालुक्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावे असे अमोल
करवते यांनी या निवेदनात मागणी केली आहे निवेदन देणारया शिष्टमंडळात अमोल करवते यांच्या सोबत अविनाश पोहरे, संतोष इंगळे, प्रवीण गवई, पवन तांबे, नितीन आडोलकर ,आकाश वैद्य आदीसह इतर कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा समावेश होता सदरचे निवेदन त्यांनी 14 ऑक्टोंबर रोजी दिले आहे