अकोट.(देवानंद खिरकर )- अकोट तालूक्यातील हिवरखेड ते रंभापुर राज्यक्रंमाक ४७ डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता हा ६ महिन्यात उखडला असुन त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. शासनाने करोडो रू खर्च करून सदर रस्ता बांधला आहे.पण बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या भष्टाचारी वुत्तीने सदरहू रस्ता उखडला असून त्या रस्त्यावर टाकण्यात आलेला डांबरीकरण माल निकृष्ठ दर्जाचा टाकण्यात आल्या मुळे तो रस्ता पूर्ण होण्याआधी उखडून गेला व मोठे खड्डे पडले आहेत. शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंदाजपत्रक प्रमाणे काम झाले नाही त्यामुळे पूर्ण उखडला आहे. या रस्त्यांची पाहणी करून त्रयस्त पक्षामार्फत चौकशी करून सदरवहू अधिकारी यांच्या वर कार्यवाही व ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे व या रस्त्यांसाठी जो खर्च झाला तो खर्च ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा या बाबत युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल रामाभाऊ कराळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले.