अकोला(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया अंतर्गत जे काही लोक दोन समाजात तेढ निर्माण करू इच्छित आहेत असल्या लोकांवर कारवाही करणे ,बाळासाहेब आंबेडकर हे बौद्ध समाजाचे नेते असून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत श्रेध्येय बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी संविधानाचा विचार करून असंविधानिक शब्द कुठेही बोलत नाहीत परंतु काही समाज विरोधक लोक या त्यांच्या प्रतिक्रियांचा दुरूपयोग करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी असल्या लोकांवर सोशल मीडिया बॅन व त्यांच्यावर योग्य ती कारवाही करण्यात यावी. आधार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, अकोला जिल्हा संस्थापक अध्यक्ष रणजीत भिमराव तायडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे तसे उपस्थित मान्यवर रामभाऊ इंगळे, पवन शेगोकार, प्रेम इंगळे, शुभम पवार, अमोल इंगळे, नागेश बनसोड, सुनील रिठे, मोहमद साबिर, आसिफ भाई, होते.