अकोला,दि. 14 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 152 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोट येथे 22 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, 58 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 29 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 152 चाचण्यांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 19442 चाचण्या झाल्या त्यात 1395 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.