अकोला : रुद्र अपंग निराधार वर्गाला देण्यात येणारे जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान पांच महिनेपासुन अदा करण्यात आले नाही त्यामुळे निराधार वर्गाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या शासकीय अनुदानावर जीवन असल्यामुळे अशा वर्गाचे जिवन जगने कठीण झाले आहे संबंधित विभागाने प्रलंबित अनुदानाचा मार्ग सुकर करुन वचीताना त्वरीत अनुदान देण्याची मागणी. पुर्णा भाऊ खोडके सामाजिक कार्यकर्ता यांनी ईमेल द्वारा बच्चुभाऊ कडु पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या कड़े केली आहे .
जिल्ह्यात निराधार वृध्दाची संख्या जास्त असून शहरी व ग्रामीण भागातील अश्या वर्गाचे जीवन या शासकीय अनुदानावरच चालत असते मात्र कोविड महामारी प्रारंभ झाल्यापासून अश्या वर्गाचे अनुदान थांबविण्यात आले आहे . अनुदान त्वरित उपलब्ध करून वृद्ध जणांना जगण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची मागणी ई-मेल द्वारा आणी एस एम एस( SMS )द्वारा पुर्णाभाऊ खोडके यांनी केली आहे…..