अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 111 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 33 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 45 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 28 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब् येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात 111 चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 18940 चाचण्या झाल्या त्यात 1367 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.