पातूर (सुनिल गाडगे)-
पातुर शहरातील वाढती लोकसंख्या आणी सध्या विविध कामांसाठी आधारकार्डची आवश्यकता पडते,गरजेनुसार आधारकार्ड मध्ये अनेक प्रकारच्या दुरूस्ती करण्याची आवश्यकताही भासते.
नवीन आधारकार्ड ची अनेक नागरीकांना आवश्यकता आहे.परंतु पातुर शहरात कुठल्याही ठिकाणी आधार सेंटर नसल्याने सामान्य नागरीकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पातुर शहराची आणी तालुक्याची लोकसंख्या पाहाता शहरात तीन ते चार आधार केंद्राची आवश्यकता आहे.
लोकसंख्या व नागरीकांचा विचार केल्यास शहरात न.प.मराठी शाळा क्र.२ संभाजी चौक,बाळापुर , न.प.मराठी शाळा क्र.१ बाळापुर वेस , न.प.उर्दू शाळा मुजावर पुरा , टि.के.व्ही.चौक आदी भागात जर आधार केंद्र उपलब्ध करून दिले तर नागरीकांना सोयीचे होईल.
बहुतांश नागरीकांनी त्यांच्या आधारकार्ड वर मोबाइल क्रमांक जोडलेला नव्हता,सध्याच्या काळात अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तसेच वैयक्तिक कामांसाठी आधारकार्ड वर मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.हे काम केवळ आधारकेंद्रावरच होऊ शकते, परंतु शहरात सध्यस्थितीत एकही आधार केंद्र सुरू नाही.त्यामुळे नागरीकांची अनेक महत्वाची कामे खोळंबलेली आहेत,तसेच नवीन आधारकार्ड काढणा-यांना आधार केंद्रच नसल्याने त्यांचे आधारकार्ड बनू शकले नाही,तरी शहरातील व तालुक्यातील सामान्य नागरीकांची समस्या लक्षात घेऊन आमच्या या मागणीबाबत त्वरीत निर्णय घेऊन आधार केंद्र सुरू करावे अन्यथा आम्हास लोकशाही मार्गाने उपोषणास बसावे लागेल,आणी याची सर्वस्वी जवाबदारी शासनाची राहील या प्रकारचे निवेदन पातुर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सैय्यद एहसानोद्दीन यांना देण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस, नगरसदस्य राजु उगले, नितिन खंडारे,रूपेश फलके आदी मान्यवर उपस्थीत होते.