तेल्हारा(प्रतिनिधि)- आज दुपारी साडे चार वाजेच्या दरम्यान पाळण्याचा फास लागण्याने शहरातील अकरा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
शहरातील नाथ नगर येथील रहिवासी तथा अजय इलेक्ट्रॉनिक चे संचालक अजय गावंडे यांच्या अकरा वर्षीय मुलाचा घरात खेळत असतांना पाळण्याचा दोरीचा अचानक फास लागल्याने फास लागून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे चार वाजेच्या दरम्यान घडली.मिळालेल्या माहितीनुसार नाथ नगर येथील रहिवासी अजय गावंडे यांचा मुलगा घरी एकटा खेळत होता तर त्याची आई लहान मुलाला ट्युशन करीता घेऊन गेली होती तर आजी बाहेर गेलली वडील बाहेर गावी गेलेले असल्याने रणवीर नामक त्यांचा मुलगा घरी पाळण्यासोबत खेडत होता मात्र खेळत असताना अचानक पाळण्याच्या दोरीचा फास गळ्याभोवती लागल्याने अन घरी कोणी नसल्याने फास लागून त्याचा मृत्यू झाला काही वेळाने त्याची आई घरी आली असता घरात रणवीर याचा मृतदेह पाळण्याला लटकलेला दिसला तसेच आईचा आर्त टाहो पाहून शेजारी धावून आले शेजाऱ्यांनी मृतदेह बघितला असता तेव्हपर्यंत रणवीर याचा मृत्यू झाला होता.रणवीर याच्या पश्चात एक लहान भाऊ आई वडील आजी असा परिवार आहे.त्याच्या मृत्यूने तेल्हारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.