अकोला – जिल्हयातील सर्व तहसिलदार यांचे खरीप पिकांच्या संदर्भात प्राप्त झालेले नजर अंदाज पैसेवारीचे प्रस्तावानुसार अकोला जिल्हयातील एकूण 1012 गावांपैकी 990 गावांची पैसेवारी काढण्यात आली असून त्यापैकी 990 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. असे निर्देश सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत. असे जितेंद्र पाळकर (भाप्रसे) जिल्हाधिकारी, अकोला यांनी कळविले आहे.