अकोला(प्रदिप कोलटक्के)-
भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड यांनी प्रमाणिकतेचा व माणूकीचा परिचय देत श्री फैजान अहमद राहणार दीपक चौक यांचा सॅमसंग कंपनीचा हरवलेला मोबाईल परत केला.
हकीकत अशी की श्री फैजान अहमद यांचा सॅमसंग कंपनीचा M20 मोबाईल अग्रसेन चौकाजवळ गाडी वरून पडला, ऍड देवाशिष काकड हे त्या रस्त्याने जात होते, त्यांना तो सापडला, ऍड काकड यांनी सदर मोबाइल रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे आणून दिला, व सदर हकीकत सांगितली, रामदासपेठ पोलिसांनी पोलीस निरीक्षक श्री मुकुंद ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनात एएसआई महेश गावंडे, साहेबराव इंगळे, स्वप्नील खेडकर,संजय जाधव, आकाश जामोदे, वैशाली जाधव, स्वप्नील चौधरी ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून सदर मोबाईल मालकाचा शोध घेऊन ऍड देवाशिष काकड यांच्या समक्ष मोबाइल फोन फैजान अहमद यांना सुपूर्द केला.
श्री अहमद यांनी भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड व रामदास पेठचे पोलीस निरीक्षक श्री ठाकरे साहेब व त्यांच्या चमूचे यांचे आभार मानले