पातुर (सुनिल गाडगे)
पातुर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार गजानन सिंह ठाकूर यांनी एक मीटिंग आयोजित करून त्यांचे मोबाईल हरवले आहेत अशा लोकांना त्यांचे हरवलेले मोबाईल 30 सप्टेंबर रोजी एक मीटिंग घेऊन त्यांना देण्यात आले
अकोला पोलीस अधीक्षक साहेब यांचे सूचना व आदेशानुसार पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील जे मोबाईल हरवलेले होते त्यांचा शोध घेऊन ते अर्जदारास परत देणे होते त्यामुळे पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंग बायस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून शोध मोहीम राबविण्यात आली यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल मनीष घुगे तसेच इतर पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले त्यामुळे पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंग बायस यांच्या हस्ते 71 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल अर्जदार यांना परत करण्यात आले मोबाईल हरवलेले मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून पातूर पोलिसांचे अभिनंदन केले