अकोला(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने केंद्रीय मंत्री ना श्री संजयजी धोत्रे , आ श्री गोवर्धनजी शर्मा, भाजपा जिल्हाध्यक्ष व आ श्री रणधीरभाऊ सावरकर , महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल , महापौर सौ अर्चनाताई मसने, शहर सरचिटणीस डॉ विनोदजी बोर्डे, श्री संजयजी जीरापुरे, श्री संजयजी गोडा, श्री अक्षयजी गंगाखेडकर यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष श्री जसमितसिंगजी ओबेरॉय यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गजाननजी शेळके यांना भाजपा अल्पसंख्याक आघाडी अकोला महानगर तर्फे 1000 मास्कचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार सावरकर यांनी सर्व जनतेस मास्क वापरण्याचे व सोसिएल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले, तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक श्री शेळके यांनी आमदार सावरकर, श्री जसमितसिंग ओबेरॉय यांचे या सामाजिक बांधीलकी बद्दल व सेवा कार्याबद्दल विशेष आभार मानले
या प्रसंगी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष श्री जसमितसिंग ओबेरॉय, शहर सरचिटणीस श्री संजयजी गोडा, श्री अक्षयजी गंगाखेडकर, श्री रीची कोहली, श्री गोल्डी ओबेरॉय, श्री हरसिमरनसिंग बिंद्रा , श्री मोहम्मद मोटरवाला, पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड, डॉ सनिष शहा, श्री विनोद जकाते, श्री अभिजित कडू, श्री संदीप गावंडे, श्री केशव हेडा, श्री रुपेश लोहकपुरे, श्री रितेश जामनारे, श्री भावेश सोलंकी, श्री अक्षय जोशी, श्री हर्मेंद्र सुनारीवाल, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.