अकोला(प्रतिनिधी)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 154 चाचण्या झाल्या त्यात 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व बाळापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे एकाची चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे दोन जणांची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 63 चाचण्या झाल्या 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 62 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचण्या झाल्या नाही, असे दिवसभरात 154 चाचण्यांमध्ये 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17441 चाचण्या झाल्या त्यात 1243 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.