अकोला,दि. 29 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 192 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे एकाची चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 61 चाचण्या झाल्या सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 71 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 50 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 192 चाचण्यांमध्ये 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17282 चाचण्या झाल्या त्यात 1220 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.