अकोला,दि.29(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 190 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 128 अहवाल निगेटीव्ह तर 62 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज तीन मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7380(6051+1174+155) झाली आहे. आज दिवसभरात 192 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 38610 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 37644, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 758 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37837 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31786 तर पॉझिटीव्ह अहवाल 7380(6051+1174+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 62 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 62 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 11 महिला व 32 पुरुष आहे. त्यात सिंधी कॅम्प येथील नऊ जण, जीएमसी येथील पाच जण, मोठी उमरी, वानखडे नगर, बाळापूर, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रेणूका नगर, डाबकी रोड, गोडबोले प्लॉट, लक्ष्मी नगर, दुबेवाडी, मराठा नगर, मोहोड कॉलनी, न्यु तापडीया नगर, कोठारी वाटीका, भागवत वाडी, खोपरवाडी, मलकापूर, कौलखेड, पिंपळखुटा, पारद, पारस, धुसर, मुर्तिजापूर व दहिहांडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सहा महिला व 13 पुरुष आहे. त्यातील मुरारका मेडीकल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित शिवाजी नगर, किर्ती नगर, सिंधी कॅम्प, आरटीओ रोड, किरोली, निपाणा, शरद नगर, घूसर, आदर्श कॉलनी, जीएमसी, मोठी उमरी, रेणूका नगर, मलकापूर, गिरी नगर व झेडपी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
तीन मयत
दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला. त्यातील श्रीवास्तव चौक, डाबकी रोड येथील 75 वर्षीय पुरुष असून तो 23 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता, त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, पारद, ता. मुर्तिजापूर येथील 50 वर्षीय पुरुष असून ते 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर बार्शिटाकळी येथील 85 वर्षीय पुरुष असून ते 21 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
192 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 39 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 22 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून दोन जण,अवगत हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून पाच जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 120 जणांना, अशा एकूण 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1462 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7380(6051+1174+155) आहे. त्यातील 229 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5689 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1462 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.